Posts

उषकाल होता होता

Image
        सुरेश भट यांची सुप्रसिद्ध रचना   उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।। आम्ही चार किरणांचीही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। १ ।। तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती आम्हांवरी संसारची उडे धूळमाती आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। २ ।। पुतळे आभार मानतात - कवी कुसुमाग्रज उभा देश झाला आता एक बंदिशाळा जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। ३ ।। धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेंच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। ४ ।। - सुरेश भट 

बाईला खूप वाटतं. किरण येले

बाईला खूप वाटतं बाईला खूप वाटतं व्हावं पुरुषासारखं उन्मत्त, धसमुसळं हात खेचून घ्यावा त्याला ओठ  ठेवून ओठांवर जाळून टाकावं जळून जावं आपण आरुढ होत लाजेवर दौडत क्षितिज...

अखेर कमाई - कवी कुसुमाग्रज

अखेर कमाई मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फ़क्त मर...

पुतळे आभार मानतात - कवी कुसुमाग्रज

तुमचे हार पोहचले जयघोष ही पोहचले कल्पनेतही नसलेले लष्करी कुर्निसातही पोहचले. फसावर चढतांना संसार जाळतांना रक्त सांडतांना आमचे एक स्वप्न होते; रंकाच्या माथ्यावरील छ...