उषकाल होता होता
सुरेश भट यांची सुप्रसिद्ध रचना उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।। आम्ही चार किरणांचीही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। १ ।। तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती आम्हांवरी संसारची उडे धूळमाती आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। २ ।। पुतळे आभार मानतात - कवी कुसुमाग्रज उभा देश झाला आता एक बंदिशाळा जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। ३ ।। धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेंच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। ४ ।। - सुरेश भट