पुतळे आभार मानतात - कवी कुसुमाग्रज
तुमचे हार पोहचले
जयघोष ही पोहचले
कल्पनेतही नसलेले
लष्करी कुर्निसातही पोहचले.
फसावर चढतांना
संसार जाळतांना
रक्त सांडतांना
आमचे एक स्वप्न होते;
रंकाच्या माथ्यावरील छपाराचे
उघड्या आंगावरील वस्रांचे,
उपाशी पोटातील अन्नाचे,
स्वातंत्र्यातील सफलतेचे,
घोष विरल्यावर,
दिवे विझल्यावर
मध्यारात्रीच्या निवांतात
गिधाडांचे थवे आले
त्या स्वप्नाचे तुकडे चोचीत घेऊन
तेही पोहचले
- कुसुमाग्रज
Wa...
ReplyDelete